शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

बरे झाले़, निवडणुकीपूर्वीच युतीची लाचारी महाराष्ट्रासमोर आली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:53 IST

साडेचार वर्षे सोबत घेतलेल्या रामदास आठवले, महादेव जानकारांचे या युतीमध्ये स्थान काय, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला़

ठळक मुद्देआठवले, जानकरांना वाऱ्यावर का सोडले?अशोक चव्हाण यांचा प्रश्न

विशाल सोनटक्केनांदेड : साडेचार वर्षे सत्तेचा मलीदा लाटत एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे सेना-भाजपा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकत्र आले. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने बरेच झाले़ यानिमित्ताने या दोन्ही पक्षांची सत्तेसाठीची लाचारी जनतेसमोर आल्याचे सांगत, साडेचार वर्षे सोबत घेतलेल्या रामदास आठवले, महादेव जानकारांचे या युतीमध्ये स्थान काय, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला़बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराची रणधुमाळी नांदेड येथून संयुक्त प्रचारसभेने सुरु होत आहे़ या पार्श्वभूमीवर खा़चव्हाण ‘लोकमत’शी बोलत होते़ चव्हाण म्हणाले, ‘मागील साडेचार वर्र्षांतील युतीच्या कारभाराबाबत महाराष्ट्रातील जनतेत संतापाची आणि फसवणूक झाल्याची भावना आहे़ खुद्द युतीतील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर नाराज आहेत़ तरीही सत्तेच्या लालसेने आज ना उद्या ते एकत्रित येतील असेच वाटत होते़ निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पाठिंबा काढून घेते की काय या भीतीने सेनेच्या दारात भाजप घिरट्या घालत होती़, तर आम्ही वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी शिवसेना नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्गाकडे बोट दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते़ मात्र कुठल्याही ठोस कारणाशिवाय हे दोन्ही पक्ष घाईघाईत एकत्रित आले़ युती करताना या दोघांनाही रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची साधी आठवणही आली नाही़’आंबेडकर, राजू शेट्टींकडून सकारात्मक अपेक्षाखरे तर आम्हीच युतीअगोदर आघाडीची घोषणा केली असती, मात्र अजूनही आम्ही प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची वाट पाहत आहोत़ मतांचे विभाजन होवू नये यासाठी समविचारी असलेल्या आंबेडकरांना चार जागा देण्याची आमची तयारी आहे़ राजू शेट्टींशीही आघाडीबाबत बोलणे सुरु आहे़ या दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अद्यापही अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दिल्लीतील बैठकीनंतर उमेदवारांची यादीकाँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या याद्या तयार आहेत़ अंतिम निर्णयासाठी त्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येत आहेत़ उमेदवार यादीच्या छाननीसाठीची दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल़ त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़इतर पक्षांसोबत असलेल्या आघाड्यांबाबत...काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काही मोजक्या जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबत आहेत़ अशा आघाडी तोडण्याचा निर्णय झाला आहे काय? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ‘राज्यपातळीवर आम्ही एकत्र लढायचे निश्चित केले आहे़ जिल्हा, तालुकापातळीवर काही स्थानिक मुद्दे आहेत़ त्यामुळे एकत्रित बसून संबंधित जिल्ह्यांतील पदाधिकाºयांशी चर्चा करुन त्यानंतरच सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल.’आज आघाडीची भूमिका स्पष्ट करणारराष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह शेकापचे जयंत पाटील, रिपाइंचे जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्यासह आघाडीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी बुधवारी नांदेड येथे होणाºया संयुक्त सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्येच आम्ही आघाडीची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक