शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हवामान यंत्रे सदोष,अनेक वर्षांपासून दुरुस्तीच नाही; मग पीकविमा कसा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:20 IST

अनेक वर्षांपासून बसविलेल्या यंत्रांची देखभाल दुरुस्तीच केली नाही

नांदेड : पिकांच्या नुकसानीच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्रे जवळपास प्रत्येक महसूल मंडळात बसविण्यात आलेली आहेत. मात्र, या यंत्राची मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही यंत्रे चुकीच्या पद्धतीने नोंदी घेत असून, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होऊनही त्यांना विमा कंपनीकडून पीकविमा नाकारला जात आहे.

जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड, भोकर व नांदेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व अन्य काही तालुक्यांतही कमी-जास्त प्रमाणावर बागायती केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परंतु, सध्या मागील काही वर्षांपासून हवामानातील प्रतिकूल बदलामुळे केळी पिकावर हवामान आधारित अनेक संकटे जसे की, गारपीट, अतिउष्णता, अतिथंडी, वादळी वारे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व संकटांपासून आर्थिक संरक्षण मिळावे, याकरिता केळी उत्पादक शेतकरी हवामान आधारित पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवितात.

हवामान आधारित पीकविमा योजनेमध्ये, स्वयंचलित हवामान यंत्रांच्या वातावरणातील हवामानाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा पीकविमा मिळणार की नाही, हे ठरते. म्हणजेच स्वयंचलित हवामान यंत्रांच्या नोंदी अचूकपणे घेणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. स्वयंचलित हवामान यंत्रांच्या नोंदी चुकीच्या असल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनसुद्धा शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ न मिळाल्याचे आजवरची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण, आंदोलनेही केली आहेत.

२०२० मध्ये यंत्रे आढळली होती सदोषजिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या स्वयंचलित हवामान यंत्रांच्या तपासणीत अनेक यंत्रे सदोष आढळली होती. त्यामुळे त्यावेळी बागायती केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याचा कुठलाच लाभ झाला नव्हता.

हवामान यंत्रांची तज्ज्ञांमार्फत चौकशी कराबागायती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची तीव्रता लक्षात घेता या विषयावर तातडीची बैठक आयोजित करून जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान यंत्रांची तज्ज्ञांच्यामार्फत तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी