कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही, आत्महत्या घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:27+5:302021-04-27T04:18:27+5:30
२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही ...

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही, आत्महत्या घटल्या
२०१९ मध्ये जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट देशासमोर उभे राहिले. काही दिवसांतच शहरात पोहोचलेली कोरोना महामारी ही गावागावांत आली. त्यामुळे कोरोनापुढे सर्वच हतबल झाले. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. शहरे ओस पडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वर्षभरापासून हे दुष्टचक्र असेच सुरू आहे. २०२१ मध्ये परिस्थिती बदलण्याची अपेक्षा होती. ऐन उन्हाळ्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुरू झालेला व्यवहार पुन्हा बंद पडला. त्यामुळे अनेकांनी जीवनयात्रा संपविली. मात्र, या काळात शेतकरी लढत होता. अवकाळी निसर्गासोबतच महामारीला त्याने हिंमतीने तोंड दिले. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी हिंमतीने कोरोना काळावर मात केली.
चौकट- संकट माझ्या एकट्यावर नाही
- कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे. त्यामुळे या काळात केवळ मीच एकटा अडचणीत नाही, तर सर्वच अडचणीत आहेत, ही सामूहिक भावना तयार झाली. एरवी स्वत:च्या अडचणीत, प्रश्नात अडकलेले अनेकजण कोरोना काळात इतरांच्या दु:खात धावून गेले. त्यामुळे वैयक्तिक सुख, दु:खाची भावनाच गळून पडली. हे एक कारण आत्महत्या घटन्यामागे असू शकते, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी दिली.
- कोरोनाचे संकट म्हणून आत्महत्या
- जिल्ह्यात कोरोनाकाळात वर्षभरात ७७ आत्महत्या झाल्या. शासन, प्रशासनस्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. गतवर्षभरापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. त्यातच ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.