मरखेल : गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एक टाकी पाण्यासाठी १५० ते २०० रुपये तर कडब्याची पेंडी १५ रुपयाला बाजारात मिळत आहे.मरखेल परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तापमान ४० अंशावर गेले आहे. मार्च महिन्यातच नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक बॅरेल पाण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत असल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड झाले असून पशुधन विक्रीस काढण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारील कर्नाटक राज्यातील औराद येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे नेली जात असून त्याची कवडीमोल दराने विक्री केली जात आहे. असमाधानकारक पावसामुळे चार-पाच वर्षांपासून शेतीतून पुरेसे उत्पन्न न निघाल्यामुळे व खाजगी सावकाराचे घेतलेले कर्ज वाढत चालल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असून दुष्काळावर मात करण्यासाठी फसव्या पॅकेजऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करून शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठेबरोबर अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे.शेतकºयाचा सध्या नगदी पिकाकडे जास्त कल असल्यामुळे ज्वारीचे पेरा क्षेत्र कमी झाले. परतीच्या पावसाने यंदा दगा दिल्याने काही प्रमाणात होणाºया रबीच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्यामुळे कडब्याचे दर वाढले आहे़ हायब्रीड ज्वारीच्या कडब्याची पेंडी दहा ते पंधरा रुपये दराने मिळत असून टाळकी (बडी) ज्वारीची पेंडी वीस रुपयाला एक या दरात खरेदी करावे लागत असल्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. चाराछावण्या व टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.तीव्र टंचाईमुळे नळाला चार-चार दिवस पाणी येत नाही व सार्वजनिक विहिरीजवळ सांडपाण्यामुळे झालेली दुर्गंधी यामुळे बाटलीबंद पाण्याला ‘अच्छे दिन’ आले. वीस लिटरच्या जारला पंधरा रुपये मोजावे लागताहेत़ विना परवाना हा व्यवसाय बिनबोभाट सुरु असून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विनाप्रमाणित पाणी बाटलीबंद करून विकले जात आहे़ यातून दरमहा लाखोंची उलाढाल होत आहे.
२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:41 IST
गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून
२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी
ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता मरखेल परिसरात पाण्याचा अन् चाऱ्याचा प्रश्न गंभीर