शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा; राज्याच्या इतिहासातला काळा दिवस - नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 17:22 IST

राज्यात जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची कामे याच गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण राज्य दोन वर्षात टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नांदेड : राज्यात जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची कामे याच गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण राज्य दोन वर्षात टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला़ त्याचवेळी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा दिवस म्हणजे राज्याच्या इतिहासातला काळ दिवस असल्याचे ते म्हणाले़ 

लोहा येथे झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते़ राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ बुलडाणा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण केला होता असे सांगत गडकरी म्हणाले, या कामातून १२ लाख टन गाळ तेथील नदीनाल्यातून बाहेर काढण्यात आला़ या गाळ उपसाने आता पाण्याची पातळी वाढणार आहे़ त्याचवेळी सिंचन क्षेत्रातही वाढ होईल़ परिणामी शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे़ केंद्रीय जलसंपदा विभागामार्फत राज्यात १७० बंधारे बांधण्यात येणार आहेत़ या बंधाºयाचा उपयोग पूल म्हणूनही होणार आहे़ या पद्धतीचे नांदेड जिल्ह्यात तीन बंधारे असतील तर लातूरमध्येही अशी बंधारे उभारली जात आहेत़ आंध्र प्रदेशात पोलावरम धरण केंद्र सरकार बांधत आहे़ यासाठीही ६० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ राज्यातही सिंचनाची कामे करण्यासाठी केंद्राकडून निधीची कमतरता राहणार नसल्याचे ते म्हणाले़ 

आपल्याकडे लक्ष्मीदर्शन नाहीकेंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि जलसंपदा विभागामार्फत कोट्यवधींची कामे सुरू आहेत़ ही कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच वेळेमध्ये पूर्ण व्हावीत याकडेच आपले लक्ष असते़ एकाही ठेकेदाराला मला भेटण्याची गरज नसल्याचे सांगताना गडकरी यांनी लक्ष्मीदर्शनाचा विषय आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले़ लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात केला होता़ त्यांच्याच उपस्थितीत गडकरी यांनी लोह्यामध्ये लक्ष्मीदर्शनाचा विषय काढला, हेही विशेष.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीWaterपाणीwater shortageपाणीटंचाईState Governmentराज्य सरकारlaturलातूर