शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीतून सिंचनासाठी पाणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:24 IST

विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग पाण्याच्या कमतरतेमुळे दुसरी पाळी अनिश्चित

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी गुरुवारपासून सोडण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हे पाणी सोडले जाणार असून दुसरी पाणीपाळी मात्र अनिश्चित असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे धोरण लक्षात घेता विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी सोडण्यात आली असली तरी दुसरी पाणी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरच पिकाचे नियोजन करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला गोदावरीच्या दोन्ही किणाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत आहे. त्याचवेळी विष्णूपुरीत गेल्या महिनाभरात २३ दलघमी पाणी कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून प्रशासनाची पथके रवाना होणार आहेत. अवैधरित्या पाणीउपसा करणारे विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. त्याचवेळी महावितरणकडून प्रकल्प क्षेत्रातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.दरम्यान, महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहराला आता दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी असलेले येलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन्ही पर्याय कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा, यासाठी नियोजन केले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पvishnupuri damविष्णुपुरी धरणwater shortageपाणीटंचाई