शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:54 IST

मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे.

ठळक मुद्देकळमनुरी : आराखड्याला निवडणुकीचा खोडा

कळमनुरी : मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. पं.स.ने बनविलेला संभाव्य पाणीटंचाई आराखडा कागदावरच असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ६० ते ७० गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासन लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीने ४ कोटी ७३ लाखांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून तो मंजूरही करून घेतला आहे. टँकरने पाणीपुरवठा व अधिग्रहण वगळता इतर कोणत्याही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना होत नाहीत.हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या पाण्याची मागणी वाढली असून त्यांचा धंदा मात्र सध्या तेजीत सुरू आहे. खरीप हंगामानेही यावर्षी दगा दिला. खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजना दुरूस्ती, विधन विहिरीची दुरूस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे आदी कामांना संभाव्य आराखड्यात मंजुरी मिळाली आहे. परंतु ही कामे अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे अनेक गावांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील नांदापूर येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ६८ लाखांचे नळ योजनेचे काम सुरू आहे. निवडणूकीच्या कामामुळे पाणीटंचाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.अधिग्रहण प्रस्ताव : मंजुरी मिळूनही धूळ खातसध्या तालुक्यातील शिवणी खु., माळधावंडा, हातमाली, पाणबुडीवस्ती, पोत्रा, सिदगी, महालिंगीतांडा, कुपटी या आठ गावांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४० गावांत ५० अधिग्रहणाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अजूनही १५ ते २० अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या हंगामात ७९ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जलस्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.३५ नळ योजना बंदतालुक्यातील ३५ नळ योजना किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत. तालुक्यात एकूण १ हजार ७५ हातपंप असून त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हातपंप किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई