शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननामुळे पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:15 IST

बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़

ठळक मुद्देमांजरा नदीपात्रातील रेती उत्खननास परवानगीबिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

सगरोळी : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़मांजरा नदीपात्रातील विहिरींद्वारे १२ किमी अंतरावर असलेल्या बिलोली शहरासह जवळपास ५० किमी क्षेत्रात असलेल्या सगरोळी परिसरासह बडूर हिंगणी, चिंचाळा, लघूळ, बोळेगाव या पाच गावांची तहान भागविली जाते. या ठिकाणाहून रेती उत्खननामुळे या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक पाणीपुरवठा ठिकाणापासून काही अंतरावर रेती उत्खननास परवानगी देऊ नये, असा नियम असतानाही रेती उत्खननाची परवानगी दिल्याने पर्यावरण क्षेत्रातील काही व्यक्ती, संस्थाकडून नाराजी व्यक्त होत आहे.सगरोळीसह परिसरातील मांजरा नदीपात्रात बोळेगाव हद्दीतील ३३५ गट नंबरमध्ये बिलोली शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या चार तर बडूर विभागातील पाच गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत दोन अशा एकूण सहा विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो.कार्ला बु., नागणी, माचनूर, गंजगाव, सगरोळी मांजरा नदीपात्रातून त्या- त्या गावासह तालुक्यातील एक लाख लोकांची तहान भागविली जाते. १५ वर्षांपासून मांजरा नदी पात्रातील याच गावातील वाळू घाटातून बेसुमार रेती उत्खनन होत आहे.नदीतील जलचर , वनस्पती झाल्या नष्टनियमित रेती उत्खननामुळे नदीचे पात्र बदलले असून नदीतील जलचर तथा आवश्यक असणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या असून त्याची जागा आता काटेरी, विषारी व अनावश्यक वनस्पतींनी घेतली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे जैविक व रासायनिक पाणी परीक्षण अहवाल पाहिल्यास पाण्यामध्ये नायट्रेट, फ्लोराईड व टीडीएस मोठ्या प्रमाणात असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट दिसून येते. परिसरातील पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून दूषित पाण्यामुळे परिसरात फ्लोरोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचेही शासकीय रुग्णालयांच्या आकडेवाडीवरून स्पष्ट होते.पाणीटंचाईस कोण जबाबदार ?बिलोली शहरासह इतर ठिकाणी होणा-या पाणी पुरवठ्याच्या विहिरी बिलोली नगर परिषद तर सगरोळी व बडूर विभाग पाणीपुरवठ्याच्या विहिरी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मालकीच्या आहेत. रेती उत्खननाचा वाईट परिणाम भविष्यात पाणीपुरवठ्यावर झाला तर त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न असून यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रेती उत्खननास विरोध करावा, परंतु तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूwater shortageपाणीटंचाई