नांदेडकरांवरील जलसंकट तूर्त टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:17 IST2018-02-11T00:16:59+5:302018-02-11T00:17:13+5:30
महापालिकेच्या उच्च दाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली़ त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही़ दरम्यान, ११ कोटींपैकी ९४ लाख रूपयांचा धनादेश महावितरणला दिल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ त्यामुळे तूर्तासतरी नांदेडकरांवरील जलसंकट टळले आहे़

नांदेडकरांवरील जलसंकट तूर्त टळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या उच्च दाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली़ त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही़ दरम्यान, ११ कोटींपैकी ९४ लाख रूपयांचा धनादेश महावितरणला दिल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ त्यामुळे तूर्तासतरी नांदेडकरांवरील जलसंकट टळले आहे़
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा करणाºया उच्चदाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये तर लघुदाब ग्राहकांकडे १४ कोटी असे एकूण २५ कोटी रूपये वीजबिल थकले आहे़ दरम्यान, महावितरणकडे विविध करापोटी महापालिकेचे सहा कोटी रूपये येणे शिल्लक आहे़ दरम्यान, महावितरणकडून दिल्या गेलेले बिल आणि दंडाची रक्कम महापालिका अधिकाºयांना मान्य नाही तर महावितरणच्या विविध मालमत्तांच्या करापोटी महापालिकेला देय असलेली रक्कम महावितरणला मान्य नाही़ त्यामुळे थकित वीजबिल आणि कर यात ताळमेळ बसलेला नाही़ आजपर्यंत यावर तोडगा न निघाल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली़ गुरूवारी सायंकाळी दक्षिण नांदेड तर शुक्रवारी सकाळी उत्तर नांदेड भागातील महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची वीज तोडल्यामुळे शहरावर जलसंकट ओढवले़ दोन्ही यंत्रणांकडून थकित बिल, करापोटी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत़ परंतु, नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ दरम्यान, महापालिकेने कारवाई थांबविण्यासाठी महावितरणला जवळपास ९४ लाख रूपयांचा धनादेश दिला आहे़ त्यामुळे उच्चदाब ग्राहकांचा खंडित केलेला वीजपुरवठा २४ तासांनी सुरळीत करण्यात आला आहे़ परंतु, येणाºया काळात उर्वरित २४ कोटी थकित वीजबिल न मिळाल्यास पुन्हा महापालिकेचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून केव्हाही होवू शकते़