शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला 'चिखल' धुवून टाका; उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 12:44 IST

गद्दारी झाली नसती तर, महाराष्ट्र पुढे गेला असता - माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

भोकर : देशात हुकुमशाही विरुद्ध लाट आहे. घटना बदलण्याची लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मोदी सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.  शिवसेनेचा सातबारा बदलून तो गद्दाराच्या नावे केला, त्याचप्रमाणे उद्या आमचाही सातबारा बदलणार की काय? अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तसेच देशातील हुकूमशाहीचे संकट दूर करण्यासाठी नांदेडात झालेला 'चिखल' धुवून टाका, असे आवाहनही ठाकरे यांनी मतदारांना केले. त्यांनी आज सकाळी पत्रकारांसोबत संवाद साधला.  

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. भोकर येथील तलाव रिसोर्टवर आज सकाळी ११ वाजता माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन टोकाचे तीन पक्ष एकत्र येवून, सन २०१९ मध्ये महाआघाडीचे सरकार माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. एक चांगले सरकार चालत होते. परंतु गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्र पुढे गेला असता. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, पण दुसरीकडे सामान्य जनतेची सुरक्षा सोडून राज्य सरकार गद्दाराच्या सुरक्षेवर खर्च होत असल्याचा घणाघात केला. 

अशोकराव चव्हाण गेले तरी नवीन चेहरे काॅंग्रेस मध्ये येत असल्याने, काॅंग्रेसला नवचैतन्य प्राप्त होत आहे. नेते गद्दार झाले तरी मतदार गद्दार होत नाहीत असा विश्वास व्यक्त केला.  तसेच हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला चिखल धुवून टाका असा टोला महायुतीचे उमेदवार खा. चिखलीकर यांचे नाव न घेता लगावत ठाकरे यांनी महाआघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना विजयी करा असे आवाहन केले. 

यावेळी महाआघाडीचे उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण, कमलकिशोर कदम, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील बेटमोगरेकर, बी. आर. कदम, गोविंदबाबा गौड, बाळासाहेब रावणगावकर, प्रकाश भोसीकर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) डॉ. सुनील कदम, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४