वाजेगावची भागवत कथा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:53+5:302021-02-24T04:19:53+5:30
तहसीलदारांना निवेदन नायगाव - प्रचलित नियमांनुसार विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे अशी मागणी विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने तहसीलदारांना ...

वाजेगावची भागवत कथा रद्द
तहसीलदारांना निवेदन
नायगाव - प्रचलित नियमांनुसार विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे अशी मागणी विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शिष्टमंडळात प्राचार्य एम.बी.ताटे, ई.एस.कल्याण, एस.ए. भालेराव, प्रा.हंबर्डे, प्रा.नकाते, प्रा.मोरे, प्रा.एम.व्ही.बावरे, प्रा.वसमते, प्राचार्य अनिता गोपछडे आदी उपस्थित होते.
कदम कुटुंबीयांचे सांत्वन
हदगाव - निवघा बाजार येथील पत्रकार गजानन कदम यांच्या वडिलांचे अलीकडे निधन झाले. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. यावेळी निवघ्याचे उपसरपंच श्याम पाटील व अन्य उपस्थित होते.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम
नायगाव - माजी आ. वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने बेळगेनगर येेथील गणेशराव पाळेकर यांच्या निवासस्थानी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदी कुंकू देऊन सन्मान करण्यात आला.
पेनूर जि.प. शाळेत मास्कचे वाटप
लोहा - तालुक्यातील पेनूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जि.प. हायस्कूलचे मुख्याध्यापक अर्जुन कांबळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नूतन सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच कोंडीबा फरकंडकर, शा.व्य.स.चे अध्यक्ष गंगाधर एडके आदी उपस्थित होते.
जारीकोट येथे क्रिकेट स्पर्धा
धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट येथे कै. अमितभाऊ मित्रमंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेला २१ पासून सुरुवात झाली. गजानन रामोड, नागेश रामोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पहिले बक्षीस १५ हजार ५५५ रुपये, दुसरे ७ हजार ७७७, तिसरे ३ हजार ३३३ रुपये आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी १ हजार १११ रुपये, बेस्ट बॅटस्मन १ हजार १११, बेस्ट बॉलर १ हजार १११ रुपये दिले जाणार आहेत.
लोह्याची वाळू नायगावात
नायगाव - महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून नायगाव तालुक्यात वाळू आणली जात आहे. लोहा तालुक्यातील येळी, कौडगाव व कापसी येथून विना पावती वाळूची वाहतूक सुरू आहे. येथील वाळू नायगाव तालुक्यात दिवसरात्र आणली जात आहे. नायगावचे तहसीलदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे.
सेवालाल महाराज जयंती
अर्धापूर - तालुक्यातील चेनापूर तांडा येथे सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने हभप प्रकाश महाराज हिंगोलीकर यांचा कार्यक्रम झाला. २१ रोजी महाप्रसाद वाटप करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात आली नाही. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
विवाहितेचा छळ
कंधार - माहेराहून ३ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पैशासाठी विवाहितेला मारहाण ही केली जात होती. तिच्या पतीने परवानगी शिवाय दुसरे लग्नही केले. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास फौजदार इंद्राळे करीत आहेत.
अभ्यंकर यांना श्रद्धांजली
धर्माबाद - पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी निगडीचे संस्थापक अध्यक्ष वा.ना.अभ्यंकर यांचे २१ रोजी निधन झाले. त्यांना पानसरे शाळेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव विश्वनाथराव बन्नाळीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी. कुलकर्णी, एस.आर.देबडवार, जी.बी. पांचाळ, श्रीराम गोविंदलवार, मुख्याध्यापक गंगाधर पवार, एम.एन. मठपती, पर्यवेक्षक गायकवाड आदी उपस्थित होते.
सोनखेड रस्त्याचे भूमिपूजन
लोहा - आ. मोहन हंबर्डे यांच्या स्थानिक विकास निधीतून सोनखेड येथे सीसी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, संस्थानचे अध्यक्ष भगवानराव मोरे, हभप बापूराव महाराज, डॉ. पंडितराव मोरे, नरसिंगराव मोरे, उपसरपंच प्रवीण मोरे, ग्रा.पं. सदस्य विलास मोरे, कृष्णा मोरे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी कदम
धर्माबाद - रायुकाँच्या उपाध्यक्षपदी नागेंद्र पाटील कदम चोळाखेकर तर शहराध्यक्षपदी मोहसीन खान यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी केली. या नियुक्तीचे पत्र देताना भोजराज गोणारकर, डॉ. सुधीर येलमे, सुधाकर जाधव, आबेद अली, शफीक अहमद, रवींद्र शेटी, हणमंत पाटील, पंडित पाटील, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, माराेती माकणे, माजी नगरसेवक मतीन, सय्यद सुलताना, हनुमंत किरोळे उपस्थित होते.