शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरला; नांदेडला तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:40 IST

विष्णूपुरी जलाशय तुडुंब भरल्याने टंचाईचे संकट टळले

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णयपाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करा

नांदेड :  मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नांदेडकरांना आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरल्याने महापालिकेने शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रसिद्ध केले जाणार आहे़ त्यानंतर तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनासोबतच पाण्याचे संकट दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला़  

मागील वर्षी अल्पपावसामुळे  पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ विष्णूपुरी जलाशयात उपलब्ध असलेले पाणी अवैध उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारीतच कमी झाले़ त्यामुळे नांदेड शहराला मार्चपासून पाच दिवसांआड व   एप्रिल, मे, जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात  सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा पावसाळ्यातही कायम होत्या़ अर्धा पावसाळा संपला तरी विष्णूपुरी जलाशयात पुरेसा साठा उपलब्ध झाला नव्हता़ 

मागील तीन महिन्यांत केवळ ४५ टक्के  पाऊस झाल्याने नदी- नाले, धरणे, बंधारे कोरडेच होते़ तर दुसरीकडे नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात केवळ १७ दलघमी पाणी उपलब्ध झाले होते़ पावसाचे प्रमुख नक्षत्रे कोरडेच गेल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ दरम्यान, जायकवाडी धरण पूर्ण भरल्यामुळे या पाण्याची प्रतीक्षा करण्यात येत       होती़ परंतु, जायकवाडीचे पाणी विष्णूपुरी जलाशयातपर्यंत पोहोचले नाही़

जायकवाडीच्या पाण्याचा लाभ ढालेगाव व विटा बंधाऱ्यापर्यंत झाला़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होत होते़ ऐन पावसाळ्यात नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत होते़  आठवड्यात एक वेळेस  येणाऱ्या टँकरवर पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती़  मागील दहा, पंधरा वर्षांत प्रथमच पाणीटंचाईचे गंभीर संकट नांदेडकरांनी अनुभवले होते़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात कधी पाणी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे विष्णूपुरी भरण्याची आशा मावळली होती़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात असलेल्या पाण्याचे काटकसरीने नियोजन केले होते़ आठ दिवसांत एक वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याचा संचय करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता़ मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पाण्यासाठी वैतागलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला़  गोदावरी नदीक्षेत्रात या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला़ सोमवारी  विष्णूपुरी जलाशय पूर्ण भरल्याने  नागरिकांनी आनंद व्यक्त केला़ 

पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर कराच्पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांना आता तीन दिवसांआड पाणी मिळणार आहे़ यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले, विष्णूपुरी जलाशय शंभर टक्के भरल्याने नांदेड शहराला आता तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा होवून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़ नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले़ 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी