गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र
By प्रसाद आर्वीकर | Updated: May 11, 2023 14:27 IST2023-05-11T14:23:19+5:302023-05-11T14:27:53+5:30
ग्रामपंचायत निवडणूकीतील खर्च न सादर करणे भोवले

गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र
नांदेड : ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील ३६८ उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशांमुळे गावपुढाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात ८ तालुक्यांमध्ये १८ सप्टेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर करण्यास कसूर केल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४ ब नुसार पुढील ५ वर्षांकरीता अपात्र करण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यातील १३८ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक विभागाकडे झालेला खर्च सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या उमेदवारांना पुढील ५ वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचे आदेश ९ मे रोजी काढले आहेत. पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याच्या या आदेशांमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.