शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अवैध रेती उपशानेच विद्यार्थ्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:46 IST

शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ महसूल प्रशासनाने या वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला़

ठळक मुद्देबुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू : गोदावरीवरील सर्वच घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील नावघाट परिसरात गोदावरीनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ महसूल प्रशासनाने या वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला़साईबाबा कमानीजवळ गोदावरीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या शिवनगर येथील शुभम जाधव, शुभम जगताप व आनंद केंद्रे या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ पाण्यात उतरल्यानंतर वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या अन् पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ते बुडाले़ या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वाळू उपसा करण्यात येत आहे़ बिनदिक्कतपणे हा वाळू उपसा सुरु आहे़विशेष म्हणजे, या ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी कुठलीही परवानगी नाही़ तरीही वाळू उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत़ विशेष म्हणजे, याबाबत गोदावरी जीवरक्षक सेवाभावी संस्थेने २० जुलै २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून या ठिकाणी होणारा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी केली होती़ जीवरक्षक सेवाभावी संस्थेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ रेती उपसा करणाºयांना याबाबत जाब विचारला असता, त्यांच्याकडून संस्थेच्या सदस्यांनाच धमकावण्यात आले़दरवर्षी याच घाटावर गणेश विसर्जन करण्यात येते़ त्यामुळे त्यावेळी रेती उपशामुळे जीवितहानी होवू शकते़ या घाटावरील रेती उपसा त्वरित बंद करुन उपसा करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती़ परंतु, प्रशासनाने जीवरक्षक सेवाभावी संस्थेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले़ शनिवारी त्याच ठिकाणी या मुलांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला़दरम्यान, विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता़ तो पाहून या ठिकाणी वाळू उपसा करणाºयांनी घाटावरुन पळ काढला़ काही वेळातच या ठिकाणचे वाळूचे ट्रकही गायब झाले़ यावेळी नागरिकांनी त्यांचा शोधही घेतला़ परंतु, ते सापडले नाहीत़---नदीपात्रात ठिकठिकाणी २० फूट खोल खड्डेगोदापात्रात सर्वच घाटांवर अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे़ शनिवारी बुडालेले विद्यार्थी काढण्यासाठी जीवरक्षक दलाचे जवान नदीपात्रात उतरले असता, त्या ठिकाणी जवळपास २० फुटांपर्यंतचे खोल खड्डे पडलेले दिसून आले़ सर्वच घाटांवर अवैध वाळू उपशामुळे असे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीवही गेला आहे़ याबाबत प्रशासनाला निवेदन देवूनही कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे या खड्ड्यामध्ये पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे़याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे गोदावरी जीवरक्षक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सय्यद नूर सय्यद इकबाल यांनी सांगितले़---भाजपची निवेदनाद्वारे कारवाईची मागणीभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ त्यानुसार, गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे पडलेल्या खड्ड्यामुळेच तीन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला़ या ठिकाणी दररोज वाळू उपसा होत असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ अशा दोषी अधिकाºयांवर त्वरित कठोर कारवाई करावी, असे म्हटले आहे़ त्यावर दिलीपसिंघ सोढी, गुरुप्रितकौर सोढी, परमजितसिंघ ढिल्लो यांच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीriverनदी