शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : प्रेमांकुराला समाजसेवेचे खतपाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:06 IST

मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग या जोडप्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतला़

- शिवराज बिचेवार 

नांदेड : महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच सेवा योजनांच्या शिबिराच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले़ प्रेमाच्या आणाभाकासह समाजसेवेचा वसा घेत सहा वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग या जोडप्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतला़ प्रेमांकुराला समाजसेवेचे खतपाणी मिळाल्यामुळेच आयुष्यभर त्यांनी वंचितांसाठी काम करण्याचा निश्चय केला आहे़ 

प्रेम हे धर्म-जात पाहून होत नसते़ एकमेकांची मन आणि भावना जुळल्या की प्रेमांकुर फुलू लागतात़ मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग यांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले़ दोन भिन्न समाजांतील या प्रेमाला त्यावेळी मोठा विरोध झाला होता़ परंतु एकमेकांच्या साथीने त्यावर मात करीत आज २० वर्षे हे जोडपे सुख-समाधानाने राहते़ मनात रुजविलेली समाजसेवेची संकल्पना २००५ मध्ये तिरंगा परिवाराच्या माध्यमातून पुढे आली़ कुणी सोबत असो अथवा नसो, एकमेकांची साथ मात्र कायम; असा दृढ निश्चय करीत त्यांनी तिरंगा रॅली, एकता के स्वर, एक शाम आजादी के नाम यासारखे देशभक्तीपर उपक्रम सुरु केले.

त्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश होता़ त्याचबरोबर गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला़ त्यामुळे गरीब कुटुंबांची दिवाळी गोड झाली़ दोन वर्षापूर्वी सुरु केलेल्या तिरंगा वस्त्र बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख जणांना कपडे वाटप करण्यात आले आहेत़ बेग दाम्पत्याने सुरु केलेला तिरंगा परिवार आज लाखो गरिबांसाठी मोठा आधार ठरत आहे़ 

प्रेम त्यागावर करावं...महाविद्यालयीन जीवनात घेतलेला समाजसेवेचा वसा हे दाम्पत्य आजही तेवढ्याच उत्साहाने चालवित आहे़ कुटुंबांची जबाबदारी सांभाळत तिरंगा वस्त्र बँकेचा कारभारही विजयश्री पाहतात़ आज जाती-जातीत किरकोळ कारणावरुन तेढ निर्माण होत असताना बेग कुटुंबियांनी मात्र आपल्या कार्यातून प्रेम कुणावर कराव़ं....क़ुणावरही कराव...योगावर करावं...भोगावर करावं... आणि त्याहूनही अधिक त्यागावर कराव़ं...असा संदेश दिला आहे़ 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकNandedनांदेड