जिल्ह्यातील ९० केंद्रावर आज लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:16+5:302021-06-04T04:15:16+5:30
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय, बिलोली, ...

जिल्ह्यातील ९० केंद्रावर आज लस उपलब्ध
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १५ केंद्रांवर कोवि्शिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. हे डोस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दिले जातील.
उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय, भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, उमरी या ८ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. याचबरोबर ग्रामीण रुग्णालय, नायगाव, कंधार, लोहा व उपजिल्हा रुग्णालय, हदगाव या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे अनुक्रमे ९०, ३०, १० व ६० डोस उपलब्ध असून, हे सुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असून, ही लस ४५ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल.
जिल्ह्यात १ जूनपर्यंत एकूण ४ लाख ३६ हजार ८१९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले; तर ३ जूनपर्यंत कोविड-१९ लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे ४ लाख २ हजार ६३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख १९ हजार ९४० डोस याप्रमाणे एकूण ५ लाख २२ हजार ५७० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत; तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षांवरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.