नांदेड शहरात लसीकरण आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:23+5:302021-09-14T04:22:23+5:30
या मोहिमेंतर्गत गणेश मंडळांना लसीकरणासाठी लसीकरण वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे. लसीकरण वाहन १२ ते १९ सप्टेंबर या ...

नांदेड शहरात लसीकरण आपल्या दारी उपक्रम
या मोहिमेंतर्गत गणेश मंडळांना लसीकरणासाठी लसीकरण वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे. लसीकरण वाहन १२ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गणेश मंडळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रविवारी या मोहिमेचा शुभारंभ यशवंतनगर येथील गणेश मंडळ राम मंदिर येथे करण्यात आला.
या मोहिमेंतर्गत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्वात जास्त लसीकरण करणाऱ्या पहिल्या तीन गणेश मंडळांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळांनी त्यांच्या परिसरातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याकरिता प्रवृत्त करावे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकरण मोहिमेत सामील करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.
वाहन उपलब्धतेकरिता गणेश मंडळांनी वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर,सचिन जोड, सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा फरहातउल्ला बेग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.