शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट 

By श्रीनिवास भोसले | Updated: March 16, 2023 18:39 IST

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

नांदेड: जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाटाबरोबर झालेल्या पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुदखेड तालुक्यातील केळींच्या बागा, गहु भुईसपाट झाल्या तर हळद शिजविणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची धांदल उडाली. 

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत होता. त्यात गुरूवारी दुपारी अचानकपणे वेगाचा वारा अन् वीजांचा कडकडाट होवून पावसाने हजेरी लावली. मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, इजळी परिसरात गारपीटसह पावसाने पिकांचे नुकसान केले. वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाला. तर कापणी केलेला गहु त्याचबरोबर काढलेली हळद पावसाने भिजली. लोहा, नायगाव तालुक्यात करडी, गहु, ज्वारी पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे वीजेचे पोल आडवे झाले. 

कापणी केलेला गहू, हळद झाकून ठेवलेल्या फाऱ्या, ताडपत्र्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. वीजांचा कडकडाट अन् पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून शिजविलेली हळद, कापलेल्या गव्हाची वळई झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने जीव धोक्यात घालून केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाऊस अन् गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे केले जाणार असल्याचे माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी, भोकर, बिलोली, देगलूर, कंधार, मुखेड आदी तालुक्यातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अन् वेगाच्या वाऱ्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचीही धांदल उडाली. 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीNandedनांदेड