बिनविरोध निवड झालेल्या लोणी खु. ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST2021-02-14T04:17:14+5:302021-02-14T04:17:14+5:30

१२ रोजी अध्यासी अधिकारी प्रफुल्ल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तलाठी अनिल लोमटे, ग्रामसेवक संभाजी बुरगुरवाड,पोलिस ...

Unopposed selected butter khu. Congress dominates the Gram Panchayat | बिनविरोध निवड झालेल्या लोणी खु. ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचे वर्चस्व

बिनविरोध निवड झालेल्या लोणी खु. ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचे वर्चस्व

१२ रोजी अध्यासी अधिकारी प्रफुल्ल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तलाठी अनिल लोमटे, ग्रामसेवक संभाजी बुरगुरवाड,पोलिस पाटील आरुणाबाई गदादे, श्यामराव लोणे आदींनी नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. यावेळी अनुसयाबाई लोणे सरपंच व संभाजी रामजी लोणे उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य सुनील शिंदे, पार्वतीबाई जाधव, सविता जाधव, तुकाबाई शिंदे, सुभद्राबाई लोणे,सुरेखाबाई लोणे व मार्केट कमिटीचे संचालक तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संजय निवृत्तीराव लोणे यांनी सहकार्य केले. लोणी खुर्द ग्रामपंचायतवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कार्यकर्ते संजय लोणे यांनी काॅंग्रेस पक्षाचा झेंडा ग्रामपंचायत लोणी (खुर्द) येथे फडकविला असून न या निवडीबदल गावातील विविध पदाधिका-यां नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला.

Web Title: Unopposed selected butter khu. Congress dominates the Gram Panchayat