शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीने तरुणाई त्रस्त; ‘एसआरपीएफ’च्या भाेजनसेवक पदासाठी उच्च शिक्षितांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 12:23 IST

नाेकरभरती ठप्प असल्याचा परिणाम : पाेलीस भरतीची केवळ घाेषणा, अंमलबजावणीची प्रतीक्षाच

नांदेड : काेराेनासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांतील नाेकरभरती जवळजवळ बंद आहे. त्यातच काेराेनाकाळात कित्येकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेराेजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने आता मिळेल ते काम करण्याची सुशिक्षित बेराेजगारांची तयारी आहे. त्यातूनच राज्य राखीव पाेलीस दलाच्या भाेजनसेवक व सफाईगार या वर्ग-४ च्या पदासाठी चक्क उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत.

राज्यात एसआरपीएफच्या १४ गटांसाठी ही नाेकरभरती घेतली जात आहे. चतुर्थ श्रेणी वर्ग-४, गट-ड यातील भाेजनसेवक व सफाईगार या पदासाठी ही सरळसेवा भरती घेतली जात आहे. पुणे, दाैंड, जालना, मुंबई, अमरावती, साेलापूर, नवी मुंबई, हिंगाेली, औरंगाबाद, गाेंदिया, काेल्हापूर येथील जागांसाठी ही भरती हाेत आहे. त्यात भाेजनसेवकाच्या ९४ तर सफाईगाराच्या ४१ जागा काढण्यात आल्या आहेत. त्यातील ३० टक्के जागा महिलांसाठी आहेत. २० जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. त्यासाठी ७ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात या चतुर्थ श्रेणींच्या पदासाठी पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेराेजगारांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज पाहून एसआरपीएफ कमांडंटचे डाेळे विस्फारले आहेत. उच्चशिक्षितांनी केलेले हे अर्ज बेराेजगारीची तीव्रता विशद करते.

मैदानावरील तयारी ठरते व्यर्थशासनाने गेल्या काही वर्षांपासून नाेकरभरतीच घेतलेली नाही. पाेलीस शिपाई पदाच्या हजाराे जागांची भरती घेणार याची घाेषणा वारंवार सरकारमधून करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात या भरतीचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. त्यासाठी सातत्याने अलीकडे काेराेना महामारीचे कारण पुढे केले जात आहे. भरतीची घाेषणा झाल्यानंतर इच्छुक तरुण मैदानावर तयारी करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात भरती घेतली जात नसल्याने त्यांची घाेर निराशा हाेते. या भरतीच्या प्रतीक्षेत कित्येक तरुणांनी वयाेमर्यादा ओलांडली आहे तर काही त्या वाटेवर आहेत. यापूर्वी नाेकरभरतीसाठी हजाराे उमेदवारांनी अर्जही दाखल केले. परंतु काेराेना लाट उद्भवल्याने ही भरती प्रक्रिया पुढे राबविली गेली नाही.

कंत्राटीतही सेवानिवृत्तांना प्राधान्यशासनाच्या इतर अनेक विभागांत नाेकरभरतीबाबत हीच स्थिती आहे. एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शेकडाे जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे आऊटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीने या जागांवर उमेदवार घेतले जात आहेत. विविध विभागात तर सेवानिवृत्तांना प्राधान्य दिले जात असल्याने तरुणांनी राेजगार शाेधावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUnemploymentबेरोजगारीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद