बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:03+5:302021-02-23T04:27:03+5:30

औद्योगिक वसाहतींमध्ये ज्या अटीवर भांडवलदारांना जमिनी दिल्या, त्या अटी अथवा मूळ हेतूच बाजूला पडला आहे. प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा अधिक उद्योग ...

Undo closed factories | बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू करा

बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू करा

औद्योगिक वसाहतींमध्ये ज्या अटीवर भांडवलदारांना जमिनी दिल्या, त्या अटी अथवा मूळ हेतूच बाजूला पडला आहे. प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा अधिक उद्योग आजघडीला बंद आहेत. एक तर शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतींच्या नावाखाली कवडीमोल भावाने खरेदी करून त्यांच्या वारसांना भूमिहीन केले आणि दुसरे म्हणजे उद्योग बंद पाडून कामगार लोकांवर उपासमारीची वेळ आणली, याची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा या प्रश्नावर आंदोलन उभे करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर नामदेव झुंजारे, बाबू शिंदे, अरूणाताई बाबळे, प्रतापसिंह ठाकूर, राम बाबळे, गणपत गोमसकर, गौतम मांजरमकर, पंडित सोनकांबळे, अवधूत कांबळे, संजय दासरवाड, संभाजी मेकाले, विठ्ठलराव चिंचोले, दादाराव कांबळे, अशोक गोमसकर, मारोती रोडे, परमेश्वर सूर्यवंशी, राजहंस किनीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Undo closed factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.