शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीव्र दुष्काळातच रोजगार हमी योजनेची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:55 IST

मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

ठळक मुद्देगरज असताना, कामे कमी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रोजगाराचे हाल

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देणाऱ्या रोजगार हमी योजनेने यंदा मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळातच कच खाल्ल्याचे चित्र आहे़ मराठवाड्यातील ४७ हून अधिक तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, या भागातील लाखोंना रोजगाराची गरज असताना रोहयोची कामे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत  घटल्याचे दिसून येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकासाठी वरदान ठरलेली आहे. यामुळेच ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ पर्जन्यमानातील तूट, भूजलाची कमतरता यामुळे राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला़ यात मराठवाड्यातील स्थिती अधिकच गंभीर आहे़ आठ जिल्ह्यातील तब्बल ४७ तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे यंदा खरीप हंगामातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ 

रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ सन २०१६-१७ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रस्त्याची ९४४ कामे पूर्ण करण्यात आली होती़ त्या तूलनेत २०१७-१८ मध्ये ६७३ कामेच या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले़  मागील वर्षी याच योजनेतून ७ हजार ६४१ रस्त्याची कामे सुरु होती़ यंदा सुरु असलेल्या रस्ते कामांची संख्या ७ हजार २२५ एवढी आहे. अशीच स्थिती जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामांची दिसून येते़ २०१६-१७ मध्ये मराठवाड्यात ६ हजार ९९० जलसंवर्धनाची कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये ५ हजार ४१८ कामेच पूर्ण झाली़ मागील वर्षी चालू कामांची संख्या २२ हजार ९४३ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये सुरु असलेली कामे अवघी २० हजार ८७१ एवढी आहेत़ 

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात २०१७-१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मोठ्याप्रमाणात दुष्काळ प्रतिबंधक कामे हाती घेण्यात येतील असे अपेक्षीत होते़ मात्र या कामातही मराठवाड्यात रोहयोची गतवर्षाच्या तूलनेत पीछेहाट झाल्याचेच चित्र आहे़ २०१६-१७ या वर्षात मराठवाड्यात ३ हजार ५९० दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये मात्र केवळ ९५३ दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली़ २०१६-१७ मध्ये सुरू असलेल्या दुष्काळ प्रतिबंधक कामांची संख्या ६ हजार २९६ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये मात्र यात वाढ झाली असून, या वर्षात १० हजार ८० कामे सुरु आहेत़ 

दुष्काळात कशी वाढली पूरनियंत्रणाची कामे?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून २०१६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कामांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते़  मात्र, त्याचवेळी या योजनेतून पूरनियंत्रण विषयाची कामे मात्र वाढल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. २०१६-१७ या वर्षात पूरनियंत्रणाची ३० कामे पूर्ण करण्यात आली़ तर १०५ कामे सुरु होती़ त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये पूरनियंत्रणाची ५६ कामे पूर्ण करण्यात आली़, तर २६ कामे सुरु आहेत़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी