शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:09 IST

घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

भोकर : घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली.यातील आरोपी त्र्यंबक ऊर्फ गजानन घन:श्याम गोरापुडे (रा. धानोरा ता. भोकर) याने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केला होता. याबाबत प्राप्त तक्रारीवरून, भोकर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. सदर प्रकरणात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक वाळके यांनी तपास करुन न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.न्यायालयात तपासण्यात आलेल्या ५ साक्षीदारांची साक्ष व सबळ पुराव्याआधारे यातील आरोपी त्र्यंबक ऊर्फ गजानन घन:श्याम गोरापुडे यास २ हजार रुपये दंड व २ वर्षांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.जबरी चोरी प्रकरणात तीन वर्षांची कैददिवसभर दुकानातील व्यवसाय करुन घरी परतणाऱ्या दुकान मालकाजवळील पैशाची बॅग हिसकावून पळणाºया आरोपीस ३ वर्षांची शिक्षा येथील तर्द्थ जिल्हा व सत्र न्या. एन. पी. त्रिभूवन यांनी शुक्रवारी सुनावली.शहरातील प्रिन्स जर्दा स्टोअर्सचे मालक हाजी अब्दुल शुकर हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन व्यवसायाची रक्कम एका बॅगमध्ये घेवून जाताना ३ चोरट्यांनी रस्त्यात अडवून जबरीने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळून जात होते. दरम्यान, प्रसंगावधान राखून हाजी शकूर यांनी त्यातील एका चोरट्यास पकडले. यावेळी शकूर आणि चोरट्यामध्ये झटापटही झाली होती़याबाबत भोकर पोलिसांत गुन्हा नोंद करून तत्कालीन पो.नि. पेरके यांनी तपास करुन आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात येवून आरोपी लक्ष्मण प्रताप पवार (रा. चिकाळातांडा (मोठा) ता. मुदखेड ) यास ४ हजार रुपये दंड व ३ वर्षांची शिक्षा सुनावली.

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी