दोन महिलांच्या गळ्यातील गंठन हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:54+5:302021-09-24T04:21:54+5:30

दुसऱ्या घटनेत मालेगाव रस्त्यावर जैन मंदिराजवळून संगीता माधव बोडके या एम.एच.२६- एडब्ल्यू २५८६ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी ...

Two women snatched the knot from his neck | दोन महिलांच्या गळ्यातील गंठन हिसकावले

दोन महिलांच्या गळ्यातील गंठन हिसकावले

दुसऱ्या घटनेत मालेगाव रस्त्यावर जैन मंदिराजवळून संगीता माधव बोडके या एम.एच.२६- एडब्ल्यू २५८६ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चेनला हिसका मारुन पळ काढला. याप्रकरणी संगीता बोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

चौकट

गंठन चोरट्याला पकडले

दिलीपसिंह कॉलनी येथे महिलेच्या गळ्यातील गंठन हिसकावून पळ काढताना तेथे उपस्थित महामार्गाचे पोलीस कर्मचारी सय्यद सत्तार यांनी चोरट्याचा पाठलाग केला. यावेळी अन्य एक पोलीस कर्मचारी काकासाहेब रोडके यांनी त्यांना मदत केली. त्याचा पाठलाग करून चोरट्याला पकडले. या चोरट्याला वजिराबाद पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्याच्याकडून शहरातील इतर चोरींचाही तपास उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महामार्गाचे कर्मचारी सय्यद सत्तार यांचा या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

Web Title: Two women snatched the knot from his neck