धोबीगल्ली भागातून दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:58+5:302021-04-02T04:17:58+5:30
वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू नांदेड : नखेगाव फाटा ते माहूर रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. ...

धोबीगल्ली भागातून दुचाकी लांबविली
वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
नांदेड : नखेगाव फाटा ते माहूर रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २९ मार्च रोजी घडली. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवदास उत्तम ताळमवाड हे २९ मार्च रोजी एम.एच. २६, एएच ३०४० या क्रमांकाच्या दुचाकीवरून आष्टा येथे गेले होते. या ठिकाणी साडूकडे पाहुणचार केल्यानंतर ते दुचाकीने माहूरला परत येत होते. नखेगाव फाटा येथे रात्री सात वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ताळमवाड यांचा मृत्यू झाला. देवीदास ताळमवाड यांनी ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.
विद्युत साहाय्यकाला धक्काबुक्की, शिवीगाळ
थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या एका विद्युत साहाय्यकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे घडली. संतोष धनाजी सूर्यवंशी यांनी थकीत वीज बिलापोटी आरोपीच्या घरचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने बेंद्री येथील पुलावर त्यांना अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३१ मार्च रोजी घडली. दुर्गा ग्यानोबा गायकवाड असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांनी घरातील पंख्याला गळफास घेतला. याबाबत कामाजी वाघमारे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.