जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:09+5:302021-06-04T04:15:09+5:30
आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून तपासाला मात्र गती मिळत नसल्याचेच चित्र आहे. देगलूर येथे मोंढा ...

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून तपासाला मात्र गती मिळत नसल्याचेच
चित्र आहे.
देगलूर येथे मोंढा आडत दुकानासमोर भास्कर तोटावार यांनी एम.एच.२६ बीजी ०२५७ क्रमांकाची दुचाकी उभी
केली होती. चोरट्यांनी ही दुचाकी १ जूनच्या रात्री लंपास केली. तोटावार यांनी देगलूर ठाण्यात तक्रार दिली. या
तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील देगलूरनाका भागात रहेमानिया कॉलनी येथे मोहमद आसेफ याकूब यांनी आपली एमएच २६
बीएन १४२८ क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी
नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हिमायतनगर येथे टेंभुर्णी येथील चंद्रकांत देविदास अक्कलवाड यांनी आपली एमएच २६ एव्ही २८४९ क्रमांकाची
दुचाकी एका खासगी रुग्णालयासमोर उभी केली होती. चोरट्यांनी त्यांची दुचाकी २ जून रोजी चोरून नेली.
अक्कलवाड यांनी हिमायतनगर ठाण्यात तक्रार दिली.
नांदेड शहरातील शिवाजीनगर येथे हनुमान मंदिराच्या बाजूस रमेश उग्रसेनराव मुखेडकर यांनी आपली एमएच
२६- एजी ४८२५ क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी ही दुचाकी १ जून रोजी चोरून नेली. या
प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.