नायगाव, भाग्यनगरात दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST2021-07-31T04:19:09+5:302021-07-31T04:19:09+5:30

शेतकऱ्याजवळील दोन मोबाइल लंपास नायगाव : शहरात शिवाजी चौक ते नगर पंचायत रस्त्यावरून जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या खिशातील दहा ...

Two-wheeler theft in Naigaon, Bhagyanagar | नायगाव, भाग्यनगरात दुचाकी चोरी

नायगाव, भाग्यनगरात दुचाकी चोरी

शेतकऱ्याजवळील दोन मोबाइल लंपास

नायगाव : शहरात शिवाजी चौक ते नगर पंचायत रस्त्यावरून जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरट्याने लांबविले. ही घटना २९ जुलै रोजी घडली. या प्रकरणात प्रकाश जाधव यांनी ठाण्यात तक्रार दिली.

वरिष्ठ तंत्रज्ञाला केली मारहाण

वीज कापल्याचा राग मनात धरून तामसा येथे वीज कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात तिघांविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

सुभाष ढगे हे वरिष्ठ तंत्रज्ञ कार्यालयात बसले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी वीजपुरवठा का खंडित केला म्हणून ढगे यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणात मंगेश हनवते, गणपत हनवते आणि महेश हनवते यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Two-wheeler theft in Naigaon, Bhagyanagar