गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दुचाकी नांदेडची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:31 IST2018-08-30T18:30:09+5:302018-08-30T18:31:17+5:30
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली दुचाकी ही नांदेडची असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे़.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दुचाकी नांदेडची
नांदेड : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली दुचाकी ही नांदेडची असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे़ महाराष्ट्र एटीएसने ही माहिती दिल्यानंतर कर्नाटकचे विशेष तपास पथक दुचाकीच्या मूळ मालकाच्या शोधात बुधवारी नांदेडात आले होते़
गौरी लंकेश यांची बंगळुरु येथे पाच वर्षांपूर्वी ५ सप्टेंबरला दोन दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी गोळ्या घालून हत्या केली होती़ यात आरोपींनी वापरलेली दुचाकी ही नांदेडची असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाल्यानंतर या दुचाकीच्या मूळ मालकाच्या शोधात एसआयटीचे अधिकारी बुधवारी नांदेडात आले होते़ त्यांच्यासोबत एटीएसचे काही अधिकारीही होते. ही दुचाकी गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा विक्री करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे़.