चंदासिंग कॉर्नर येथून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST2021-06-30T04:12:59+5:302021-06-30T04:12:59+5:30

भिंतीच्या वादातून महिलेला मारहाण हदगाव : तालुक्यातील मरडगा येथे भिंत बांधण्यावरून झालेल्या वादानंतर स्वाती गजानन काळे या महिलेला दगडाने ...

Two-wheeler lampas from Chandasingh Corner | चंदासिंग कॉर्नर येथून दुचाकी लंपास

चंदासिंग कॉर्नर येथून दुचाकी लंपास

भिंतीच्या वादातून महिलेला मारहाण

हदगाव : तालुक्यातील मरडगा येथे भिंत बांधण्यावरून झालेल्या वादानंतर स्वाती गजानन काळे या महिलेला दगडाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत काळे या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणात हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पेैसे न आणल्यास जीवे मारणार

देगलूर : तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नातील दहा लाख रुपये हुंडा घेऊन येण्याची मागणी पीडितेला करण्यात आली होती. हुंड्याची रक्कम न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात देगलूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मुली होत असल्याने विवाहितेचा छळ

माहूर : तालुक्यातील सिंदखेड येथे महिलेला मुलीच होत असल्याचे टोमणे मारून त्रास देण्यात आला. तसेच माहेराहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात पीडितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात धमकी दिली.

खुदबईनगर भागात जुगारावर धाड

नांदेड : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुदबईनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी सात हजार रुपये जप्त करण्यात आले असून, गुन्हा नोंद झाला.

Web Title: Two-wheeler lampas from Chandasingh Corner