अशोक नगरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST2021-07-04T04:13:38+5:302021-07-04T04:13:38+5:30

नेरली परिसरात असलेल्या महमंद शफीक अब्दुल रशीद यांच्या शेतात अनधिकृतपणे आपल्या नावाचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्याला ...

Two-wheeler lampas from Ashok Nagar | अशोक नगरातून दुचाकी लंपास

अशोक नगरातून दुचाकी लंपास

नेरली परिसरात असलेल्या महमंद शफीक अब्दुल रशीद यांच्या शेतात अनधिकृतपणे आपल्या नावाचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्याला महमंद शफीक आणि त्यांच्या भावाने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी दोघा भावांना मारहाण केली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ

बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील सासर असलेल्या विवाहितेला मूलबाळ होत नसल्याने त्रास देण्यात आला. माहेराहून चार लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. या प्रकरणात किनवट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पाच लाखांसाठी विवाहितेला मारहाण

नवीन गाडी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यास असमर्थ ठरलेल्या विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. ही घटना खुपसरवाडी येथे घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Two-wheeler lampas from Ashok Nagar