कुंटूर येथून दुचाकी केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:57+5:302021-02-08T04:15:57+5:30

एक लाखासाठी विवाहितेचा छळ ऑटो घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना ...

Two-wheeler Kelly Lampas from Kuntur | कुंटूर येथून दुचाकी केली लंपास

कुंटूर येथून दुचाकी केली लंपास

एक लाखासाठी विवाहितेचा छळ

ऑटो घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना हदगांव तालुक्यातील उमरी दर्याबाई येथे घडली. पीडितेला पैशाच्या मागणीसाठी मारहाण करून घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बिलालनगर भागात जुगार अड्ड्यावर धाड

शहरातील बिलालनगर भागात टिनपत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी धाड मारली. ५ फेब्रुवारी राेजी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून २८ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दारूची चोरटी वाहतूक करताना पकडले

नायगांव तालुक्यातील कोलंबी येथे दारूची चोरटी वाहतूक करताना आरोपीला पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडून अडीच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तरकंधार तालुक्यातील मौजे बोळका येथे आठशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler Kelly Lampas from Kuntur