शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:35 IST

शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

नांदेड : शहरातील गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून, छत्रपती संभाजीनगर ‘एटीएस’सह आता स्थानिक काही पोलिस अधिकाऱ्यांनाही या तपासात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यात शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यातील एक आरोपी तर या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे पुढे आले आहे. 

१० फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक ६ च्या पार्किंगमध्ये एकाने दोघांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा नातेवाईक रवींद्रसिंघ राठोड हा मृत्यू पावला होता. विशेष म्हणजे गुरुमितसिंघ हा दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा भाऊ सत्यपालसिंग यांच्या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणात दहशतवादी रिंदाचे कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून शूटरची ओळख पटविली होती. शूटरने रेकी करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी ज्यांच्या वाहनांचा वापर केला अशा दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती; परंतु शूटर हा बाहेरराज्यातील असल्यामुळे हा तपास छत्रपती संभाजीनगर ‘एटीएस’कडे देण्यात आला. ‘एटीएस’ आणि पंजाबच्या ‘एसटीएफ’ने अमृतसर येथून हर्षदीपसिंघ भजनसिंग याला पकडले. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यानेही शूटरला मदत केली होती. त्यानंतर नांदेडातीलच राजू गिल आणि दलजितसिंघ या दोघांना मंगळवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. या दोघांनीही शूटरला पैसे, शस्त्र पुरविणे यासह त्याच्या निवासाची व्यवस्था केल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे गोळीबार प्रकरणात गिलचा महत्त्वाचा रोल असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीतबांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणात दोन हल्लेखोरांना मदत करणारे जवळपास २५ हून अधिक जण अद्यापही तुरुंगात खितपत पडले आहेत. भावनेच्या भरात यापैकी अनेकांना शूटरला मदत केली होती. या सर्वांचे कुटुंब आज अडचणीत आले आहे. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणातही पाहावयास मिळून येतो. त्यामुळे हल्लेखोराला मदत करणारे पुन्हा अडचणीत आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी