नांदेड : शहरात भरदिवसा एका तरुणीला दोन तरुणांनी जबरदस्तीने उचलून दुचाकीवरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही याची दखल घेत पथक तयार करून घटनेच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू केली आहे.
नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुण एका तरुणीला अक्षरशः उचलून घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे, तर तरुणी प्रतिकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड पोलिस तत्काळ ॲक्शन मोडवर आले असून, रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संबंधित तरुणांचा शोध सुरू आहे. मुलीला जबरदस्ती उचलून नेणारे तरुण तिच्या ओळखीचे आहेत की अनोळखी, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
व्हिडीओच्या आधारे शोध सुरूनांदेड रेल्वस्थानक परिसरातून दोन तरुण एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती घेऊन जात असल्याचा व्हायरल व्हिडीओ आम्हाला प्राप्त झाला असून, याच्या तपासासाठी पथक पाठविण्यात आले आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा हाेईल.- अबिनाशकुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड