दुचाकी अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST2021-06-16T04:25:14+5:302021-06-16T04:25:14+5:30

हाणेगाव येथील प्रशांत एकनाथ माळगे हे बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर यांच्यासोबत दुचाकीवरून कुडली येथे जात होते. वझर-हाणेगाव रस्त्यावर एकंबेकर महाविद्यालयाच्या ...

Two killed in two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोघे ठार

दुचाकी अपघातात दोघे ठार

हाणेगाव येथील प्रशांत एकनाथ माळगे हे बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर यांच्यासोबत दुचाकीवरून कुडली येथे जात होते. वझर-हाणेगाव रस्त्यावर एकंबेकर महाविद्यालयाच्या पुढे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एम.एच.२६, डब्ल्यू ५४६१ या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रशांत माळगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या बाळासाहेब आडेकर हे जखमी झाले. विरुद्ध दिशेने येणारे कोंडीबा माधवराव रुपणर रा.करडखेड यांच्यासोबत असलेले परशुराम नारायण गोपणर हे दोघेही जखमी झाले होते. यातील कोंडीबा रुपणर यांचा वाटेतच मृत्यू झाला. माळगे यांच्या मृतदेहावर हाणेगाव तर रुपणर यांच्या मृतदेहावर देगलूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात बाळासाहेब आडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Two killed in two-wheeler accident