जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST2021-07-07T04:22:44+5:302021-07-07T04:22:44+5:30

विवाहितेचा छळ नांदेड : मोबाइल दुकान टाकण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल ...

Two incidents of bike theft in the district | जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या दोन घटना

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या दोन घटना

विवाहितेचा छळ

नांदेड : मोबाइल दुकान टाकण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमर कॉलनी येथील विवाहितेला सासरच्या मंडळींनी पैसे न आणल्याने मारहाण केली. विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली.

मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

नांदेड : जुन्या नांदेडातील चप्पल मार्केट भागात स्थानिक गुन्हा शाखेने रविवारी मटका अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत रोख १५२० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे यांच्या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अवैध दारू जप्त

नांदेड- जुन्या नांदेडातील शांतीनगर येथे अवैध विक्रीसाठी साठा केलेली १ हजार ३२० रुपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. पोहेकॉ विक्रम वाकडे यांच्या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Two incidents of bike theft in the district