लसींचा स्टॉक नसल्याने दोनशेवर केंद्र बंद, मागणीपेक्षा कमी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:40+5:302021-04-27T04:18:40+5:30
प्रशासनाला शासनाच्या गाइडलाइनची प्रतीक्षा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करना लस देण्यात आली. आता येत्या ...

लसींचा स्टॉक नसल्याने दोनशेवर केंद्र बंद, मागणीपेक्षा कमी पुरवठा
प्रशासनाला शासनाच्या गाइडलाइनची प्रतीक्षा
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करना लस देण्यात आली. आता येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे. या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. प्रशासनाला आता राज्य शासनाच्या गाइडलाइनची प्रतीक्षा आहे. सध्या ४३२ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. १ मेपासून या केंद्रामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. याबरोबरच लसीचा साठाही उपलब्ध होणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा कोट
शासनाकडे नांदेड जिल्ह्यासाठी दीड लाख लसींची मागणी केली आहे. रविवारी साधारण साडेचौदा हजर लसीचे डोस प्राप्त झाले. जिल्ह्यात दररोज ४ ते साडेचार हजार जणांना लस देण्यात येत आहे. १ मे पासूनच्या मोहिमेबाबत राज्य शासनाचे दिशा निर्देशाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.
- डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.
अशी आहे आकडेवारी
सध्या सुरू असलेले केंद्र २३२
जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रे २००
दररोज किती जणांना लस दिली जाते ४,५००
जिल्हा प्रशासनाकडून मागणी - १,५०,००० लस
महानगरपालिकेच्या वतीने नांदेड शहरात आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शहरातील १० केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, तर सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून ३ उपकेंद्रांवरही लसीकरण करण्यात येत आहे. महापालिकेने लसीची मागणी केली आहे. मात्र, त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने ही मोहीम अद्यापही संथगतीने सुरू आहे. शासनाकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास नांदेड शहरात व्यापक मोहीम राबविण्यात येईल, असेे डॉ.लहाने यांनी सांगितले.