नांदेड शहरातील बालगृहातून दोन मुली पळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:06 IST2018-01-06T00:06:31+5:302018-01-06T00:06:36+5:30
शहरातील सुमन बालगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पळ काढल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

नांदेड शहरातील बालगृहातून दोन मुली पळाल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील सुमन बालगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पळ काढल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सुमन बालगृहात आजघडीला अनेक अनाथ मुली निवास करतात़ या ठिकाणी या मुलींच्या संगोपनासह शिक्षणही पूर्ण केले जाते़ त्यासाठी नांदेडातील अनेक दानशूरांनी हातभार लावला आहे़ शासनाकडून तुटपुंजे अर्थसहाय्य मिळत असल्यामुळे दानशूर मंडळीवरच बालगृहाची बरीचशी भिस्त अवलंबून आहे़ दरम्यान, नऊ महिन्यांपूर्वी बालगृहात दोन सतरा वर्षीय मुली दाखल झाल्या़ गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बालगृहात कुणालाही काही न सांगता या मुलींनी बालगृहातून काढता पाय घेतला़ ही बाब अधीक्षक अनिल दिनकर यांना समजल्यानंतर त्यांनी या मुलींचा शहरभर शोध घेतला़
त्यानंतर याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ तपास पोउपनि केंद्रे हे करीत आहेत़ तर दुसºया एका घटनेत, गोविंदनगर येथील १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्याची घटना घडली़ गोविंदनगर येथील ही अल्पवयीन मुलगी २ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती, परंतु ती शाळेत पोहोचलीच नाही़ तिच्या कुटुंबियांनी बराच शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़