शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:01 IST

इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार १३ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात बंधा-याचे दोन गेट काढून पाणी सोडण्यात आले़इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा, या मागणीसाठी ९० गावच्या शेतक-यांनी १५ दिवस आंदोलन केल्याने महाराष्ट्राचे ७ दलघमी आणि विदर्भातील ५ दलघमी असे एकूण १२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले़ परंतु वरील गावच्या शेतक-यांनी गांजेगाव बंधा-याचे गेट लाऊन पाणी अडविले़ त्यामुळे पाणी टेलपर्यंत म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत पोचलेच नाही. त्यामुळे अंदोलनामध्ये सहभागी होऊनही पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ बंधा-याच्या खालील गावक-यांवर आली होती. हि बाब लक्षात घेऊन गांजेगावच्या बंधा-याचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवावे, अशी मागणी सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगाडी, धानोरा, वारंगटाकळी, मुरली, बिटरगाव, पिपंळगाव, सावळेश्वर आदी गेटच्या खालील गावातील गावक-यांनी एका निवेदनाद्वारे उमरखेड आणि हिमायतनगर तहसीलदारांकडे केली होती. त्यामुळे पुन्हा पाण्याचा वाद निर्माण होऊ नये, आणि बंधा-याचे गेट लावणा-या वरील आणि गेटखालील गावक-यांमध्ये पाण्यासाठी आपसात भांडण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने पाणी टेलपर्यंत पाठवून समान पाण्याचा लाभ नदीकाठावरील गावांना मिळवून दिला आहे.हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तात गंजेगाव बंधा-याचे गेट काढून पाणी सोडले़ ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग उमरखेडेचे विनोद पाटील, सहाय्यक अभियंता शाहू, माने, हिमायतनगरचे नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बोरसे, बिटरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राऊत आदींसह उमरखेड - हिमायतनगर भागातील गावचे सरपंच उपस्थित होते़ बंधा-याचे २ गेटला लावलेले ८ प्लेट काढून पाणी सोडले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणार नाही, तोपर्यंत गेट चालू ठेवण्यात यावे अशी मागणी राजू पाटील शेलोडेकर, गणेश शिंदे, अरविंद पाटील, आंबराव जोडगदंड, सुदर्शन पाटील, दिलीप चव्हाण, अवधूत शिंदे, बळीराम देवकते, रामराव कोठेकर, शिवाजी पाटील आदींनी केली़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईDamधरण