जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST2021-07-05T04:13:25+5:302021-07-05T04:13:25+5:30

चार्जिंगला लावलेले मोबाइल लंपास मुखेड तालुक्यातील मौजे दापका येथे घरात चार्जिंगला लावलेले साडे पाच हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल ...

Two bikes were stolen in the district | जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

चार्जिंगला लावलेले मोबाइल लंपास

मुखेड तालुक्यातील मौजे दापका येथे घरात चार्जिंगला लावलेले साडे पाच हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल लंपास करण्यात आले. ही घटना ३ जून रोजी घडली. या प्रकरणात राजाबाई ग्यानोबा गोमडे यांच्या तक्रारीवरून मुक्रमाबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

महादेव मंदिरातील तांब्याची घंटी चोरीला

उमरी तालुक्यातील मौजे जामगाव शिवारात असलेल्या महादेव मंदिरातील ११ किलो वजनाची पितळी तांब्याची घंटी चोरट्याने लांबविली. ही घटना २ जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणात बालाजी किशनराव सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.

ऑमलेटच्या गाड्यासाठी विवाहितेचा छळ

ऑमलेटचा गाडा टाकण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना अर्धापूर तालुक्यातील पांडुरंगनगर येथे घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून मनाठा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आरटीओ परिसरात जुगार अड्डा

वाघी शिवारात असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. ३ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पालिसांनी पाच हजार रुपये जप्त केले असून, लिंबगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गोठ्यात ठेवलेली देशी दारू जप्त

हदगांव तालुक्यातील मौजे आमगव्हाण येथे अवैधपणे विक्री करण्यासाठी बैलाच्या गोठ्यात दारू लपवून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी धाड मारून या ठिकाणाहून १९ हजार रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणात हदगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Web Title: Two bikes were stolen in the district