भाग्यनगर हद्दीतून दोन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:36+5:302021-07-08T04:13:36+5:30

तेलंगवाडीत शेतातील मोटार लंपास कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथे शेतातील विहिरीवर बसविलेली १९ हजार रुपये किमतीची मोटार, वायर असा एकूण ...

Two bikes were stolen from Bhagyanagar area | भाग्यनगर हद्दीतून दोन दुचाकी चोरीला

भाग्यनगर हद्दीतून दोन दुचाकी चोरीला

तेलंगवाडीत शेतातील मोटार लंपास

कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथे शेतातील विहिरीवर बसविलेली १९ हजार रुपये किमतीची मोटार, वायर असा एकूण २३ हजार ९२० रुपयांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. ही घटना ४ जुलै राेजी घडली. या प्रकरणात बळीराम आनंदराव दासरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.

पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी छळ

माहेरहून दुचाकी आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी घेऊन येण्यासाठी औरंगाबाद येथील सासरी विवाहितेचा छळ करण्यात आला. उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नऊ हजाराची गावठी दारू पकडली

हदगाव तालुक्यातील मौजे कोळी येथे एका शेतातून पोलिसांनी नऊ हजार रुपयाची गावठी दारू जप्त केली. ५ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हदगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Two bikes were stolen from Bhagyanagar area