शहरात दोन दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:25+5:302021-06-01T04:14:25+5:30
कार्यालयातील संगणक, साहित्य चोरीला अर्धापूर शहरात महावितरणच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शेख आमेर यांच्या कार्यालयातील संगणक व इतर साहित्य चोरीला गेले. ...

शहरात दोन दुचाकी चोरीला
कार्यालयातील संगणक, साहित्य चोरीला
अर्धापूर शहरात महावितरणच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शेख आमेर यांच्या कार्यालयातील संगणक व इतर साहित्य चोरीला गेले. ही घटना ३० मे रोजी घडली. कार्यालयातील संगणक व इतर साहित्य तसेच रोख १२०० रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणात बुऱ्हान कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लसीसाठी आलेल्या महिलेने मोबाइल लांबविला
नांदेड : सध्या कोरोना लसीकरण सुरू असून त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. शहरातील जुना कौठा भागातील लसीकरण केंद्रावर लसीबद्दल विचारपूस करण्यासाठी आलेल्या एका महिलेने परिचारिकेचा मोबाइल लंपास केला. ही घटना ३० मे रोजी घडली.
पूजा विठ्ठल सोनटक्के ही परिचारिका कौठा भागातील लसीकरण केंद्रावर कर्तव्यावर होती. ३० मे राेजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक अनोळखी महिला लसीकरणाबाबत चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आली होती. सोनटक्के या कामात व्यस्त असल्याचे पाहून त्यांची नजर चुकवीत साडेसात हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास स.पो.उप.नि. गणपत गीते हे करीत आहेत.
गाडीच्या डिक्कीतील दोन मोबाइल लंपास
शहरातील मोर चौकात दुचाकी लावून पायी फिरत असताना गाडीच्या डिक्कीतील दोन मोबाइल लंपास करण्यात आले. ही घटना २२ मे रोजी घडली. शिक्षक शिवम श्यामसुंदर एमेकर हे मित्रासोबत सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडले होते. गाडी मोर चौकात लावून त्याच्या डिक्कीत त्यांनी ३५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल ठेवले होते. हे दोन मोबाइल लंपास करण्यात आले. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.