शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अडीच हजार बालके अमृत योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:11 IST

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया, स्तनदामाता व बालकांना एकवेळ चौरस आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भारतरत्न डॉ़ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली़ मात्र किनवट या अनुसूचित क्षेत्रातील ७१ अंगणवाड्यांतील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील जवळपास अडीच हजार बालके व आठशे ते नऊशे गरोदर व स्तनदामाता या योजनेपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देगरोदर व स्तनदामाता योजनेपासून कोसोदूर

गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया, स्तनदामाता व बालकांना एकवेळ चौरस आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भारतरत्न डॉ़ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली़ मात्र किनवट या अनुसूचित क्षेत्रातील ७१ अंगणवाड्यांतील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील जवळपास अडीच हजार बालके व आठशे ते नऊशे गरोदर व स्तनदामाता या योजनेपासून वंचित आहेत.अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. असे अनेक संशोधन व अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदामाता यांना अतिरिक्त पूरक आहार देण्याबाबत राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा होऊन २४ जुलै २०१५ च्या पत्रान्वये योजना सुरू करण्यात आली़ त्यानुसार किनवट तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील मोठे २१३ व मिनी १९ अशा २५० अंगणवाडी केंद्रांतील गरोदर स्त्रिया, स्तनदा अशा २ हजार २५२ माता यांना एकवेळ चौरस आहार व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी व अंडी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या ७१ अंगणवाड्यांतील आठशे ते नऊशे गरोदर स्त्रिया व स्तनदामाता तसेच सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील अडीच हजार बालके आजही अंडी व केळीपासून वंचित आहेत़ त्यामुळे ही योजना वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे आदिवासी भागात फोल ठरत आहे. विशेष म्हणजे, आदिवासी बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता वंचित असून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली.ही योजना अजूनही अनेक आदिवासी वस्तीतील अंगणवाड्यापर्यंत पोहचलेलीच नाही़

  • एकात्मिक बालविकास सेवा योजना किनवट प्रकल्प पेसाअंतर्गत ७१ अंगणवाड्यांचा समावेश पंचायतक्षेत्र विस्तार कायदा (पेसा) नाही. परंतु, संपूर्ण लोकसंख्या आदिवासी आहे, पण त्या अंगणवाड्या अमृत आहार योजनेपासून आजही कोसोदूर आहेत़ विशेष म्हणजे, अनुसूचित क्षेत्रातील ७१ अंगणवाडी केंद्राचा समावेश करण्याकरिता प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र अद्यापही सदर प्रस्ताव प्रलंबित आहेत़ परिणामी हजारो बालके आहारापासून वंचित आहेत़
  • या अंगणवाड्या योजनेपासून कोसोदूर
  • वाळकी, नंदगाव २, भुजंगनगर, सांगवी, नखातेवाडी, तळ्याचीवाडी, जरोदातांडा, गौडखेडा, उमरवाडी, सुंगागुडा ३, सावरगाव, मांजरीमाथा, वागदरी, रिठा, भंडारवाडी, गौडखेडा २, चिंचोली, दूधगाव, चिखली खु़२, टिंगणवाडी, आंदबोरीतांडा, मर्कागुडा, शास्त्रीनगर, दत्तनगर, खैरगुडा, हिप्पागुडा, सोनापूर, शिवशक्तीनगर, वंजारवाडी, झेंडीगुडा ३, सोनपेठ २, लोखंडवाडी २, सोनवाडी २, ठाकूरवाडी, जवरलापोड, गौडपूरा, हिरापूर, जरूरखेडी, तालाईगुडा २, गणेशपूर, लेंडीगुडा, लिमगुडा, वरगुडा, शिवरामखेडा, पितांबरवाडी २, बोरगावतांडा, बेलोरी, मोहपूरखेडी, राजगडखेडी, वसवाडी, प्रेमनगर, झेंडीगुडा, गणेशपूर जुने, सांभरलोळी, दत्तनगर, नवाखेडा, दुर्गापेठ, सालाईगुडा २ रिंगणवाडी अशा ७१ अंगणवाड्यांचा समावेश आहे़
टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्नEducationशिक्षण