शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपात चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:20 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.बँकेचे २१ संचालक निवडीसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. आ. चिखलीकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.  

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. बँकेचे २१ संचालक निवडीसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ संचालक, काँग्रेस-५, भाजपा-७ तर शिवसेनेचा एक संचालक निवडून आले होते. त्यानंतर  भाजपा-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित येवून सत्ता स्थापन केली. दरम्यान, प्रत्येक पक्षाला एक वर्ष अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे बापुसाहेब गोरठेकर यांना अध्यक्षपद देण्यात आले. वर्षभरानंतर शिवसेनेचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आ. चिखलीकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेंव्हापासून सदर पद रिक्त असून येत्या ३० डिसेंबर रोजी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेली महाआघाडी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर आता अध्यक्षपद भाजपाकडे येणार आहे. बँकेच्या संचालकामध्ये भाजपचे दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव राठोड, लक्ष्मण ठक्करवाड यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी यातील कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालतात याची उत्सुकता आहे.

निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  त्यानुसार २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० या कालावधीत नामनिर्देशन पत्राचे वितरण तसेच स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर लगेच नामनिर्देशन पत्राची छाननी करुन निकाल दिला जाणार आहे. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुपारी ११.५० ते १२.१५ या कालावधीत मतदान घेवून निकाल घोषित केला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणBJPभाजपा