मागणी वाढल्याने हळदीला आली तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:56+5:302021-02-06T04:30:56+5:30
हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ...

मागणी वाढल्याने हळदीला आली तेजी
हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ६० हजारापर्यंत येतो. यामध्ये बियाणे खरेदी, लागवड, खते, औषधी फवारणी, मजूरी, काढणी आणि हळद काढल्यानंतर शिजवणे तसेच फिनीशिंग प्रक्रियेपर्यंतचा खर्च समाविष्ट आहेत. हळीदचे चांगले उत्पन्न झाले तर ते एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत मिळते. साधारणपणे प्रत्येक क्विंटलला तीन हजार लागवउ ते काढणीपर्यंतचा खर्च येतो. हे सर्व गणित विचारात घेत हळदीला किमान सात ते आठ हजार भाव मिळाला तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडते, त्यापेक्षा कमी भाव मिळाला तर उत्पादन खर्चही निघत नाही असे शेतकऱ्यांची म्हणणे आहे.
हळद हे पीक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पीक असल्यामुळे विदेशातही मागणी वाढत आहे. यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे देशातील उत्पादनही घटणार आहे.त्यात देशात मागणी वाढली आहे.त्यामुळे हळदीचे दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हळदीला तेजी मिळत असल्याने दिलासादायक चित्र आहे.