शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:57 IST

लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपने आज प्रचंड ताकद लावली

ठळक मुद्देवसंतराव चव्हाण भाजपाचे चक्रव्यूह नांदेडकर भेदणार

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपने आज प्रचंड ताकद लावली असून, संपूर्ण पक्षाने एकट्या नांदेड मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रकार नांदेडचे राज्य नेतृत्व रोखण्याचा डाव असून तो नांदेडकर जनताच उधळून लावेल असा विश्वास आमदार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.मंगळवारी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आयोजित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होती. यावेळी आ. वसंतराव चव्हाण म्हणाले, अशोकराव चव्हाण यांच्याकडे काँग्रेसची राज्यातील प्रचाराची धुरा असून, काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. चव्हाण यांनी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले असून त्यांच्याच पुढाकारामुळे नांदेडचा कायापालट झाला आहे.चव्हाण यांच्यातच विकासाची धमक आणि दृष्टी असल्याने विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी नांदेडसाठी खेचून आणला. नांदेडचे हे राज्यस्तरीय नेतृत्व जपण्याची भावना आज विविध क्षेत्रांतून उमटत आहे. त्याविरुद्ध अख्खी भाजप मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा झाली. तर आश्चर्य म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी एकाच मतदारसंघात तळ ठोकून तीन सभा घेतल्या. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही सभा घेतली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठक घेत आहेत. एकंदर एका नेत्याविरुद्ध मोठी फलटण उभी करण्याचे टोकाचे प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप करीत वसंतराव चव्हाण म्हणाले की, चक्रव्युह करून नांदेडच्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याची यामागे विरोधकांची खेळी आहे. हा डाव यापूर्वीही खेळला गेला, परंतु महापालिका निवडणुकीत एकजूट दाखवित नांदेडकरांनी भाजपला रिंगणाबाहेर फेकले.देशात, राज्यात सत्ता नसताना महापालिकेची एकहाती सत्ता नांदेडकरांनी अशोकराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकली. आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणातही एकट्याला गाठण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र नांदेडची जनता हा प्रकार सहन करणार नसल्याचे सांगत, जिल्हावासिय ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले असून, मतदारसंघातील सर्व समाजघटकांबरोबर साहित्यिकांनीही जाहीरपणे अशोकरावांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच गावातील व्यापारी, सर्व स्तरातील नागरिकांनी 'नेतृत्व जपूया' ही भूमिका घेतली असून, याच नांदेडकरांच्या बळावर अशोकराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.बैठकीला बालाजी मद्देवाड, प्रा. मनोहर पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण यांनी गटनिहाय आढावा घेतला. काँग्रेस-राष्टÑवादी पदाधिकारी एकजुटीने अशोकराव चव्हाण यांना निवडून आणतील, असा विश्वासही व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण