नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:10 AM2018-12-12T00:10:36+5:302018-12-12T00:11:11+5:30

नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Tried two suicides in Nanded district | नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनकर्त्याने तर हदगांव नगरपालिकेपुढे शिवसेना नगरसेविकेच्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती़
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करणाऱ्या आंदोलकाने मंगळवारी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलिसांनी लगेच आंदोलकाला ताब्यात घेवून रुग्णालयात दाखल केले़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती़
सुनिलकुमार विठ्ठलराव धुतराज असे आंदोलनकर्त्याचे नाव आहे़ शासन मांगुर उर्फ मारुफ या माशांवर विक्रीसाठी कायमची बंदी घातली असून नांदेड जिल्ह्यात या माशांची विक्री सुरु आहे़ मांगुर माशांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी़ मत्स व्यवसाय विभागांनी मच्छीमार सहकारी संस्था यांना नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अटी व शर्ती लावलेल्या आहेत़ परंतु हे सर्व मच्छिमार सहकारी संस्था सर्व नियम धाब्यावर बसवित आहेत़ या दोन मागण्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात धुतराज यांनी आंदोलन केले होते़ त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून पुन्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते़ परंतु आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी १२ डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ मंगळवारी दुपारी धुतराज याने स्वतजवळील विषाची बाटली काढून तोंडाला लावली़ यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी लगेच धुतराज यांना ताब्यात घेवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़
तर दुस-या घटनेत पिण्याचे पाणी आणि प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्यामुळे शिवसेनेच्या महिला नगरसेविकेने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हदगांव नगरपालिकेसमोर घडली़
विद्या भोस्कर असे नगरसेविकेचे नाव आहे़ त्या शहरातील प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत़ प्रभागातील पाणी आणि नागरी समस्येसाठी भोस्कर यांनी अनेकवेळा मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा केला़ परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्या निराश झाल्या होत्या़ ५ डिसेंबर रोजी मुख्याधिकाºयांनी प्रभागातील नागरी समस्या नमूद करताना ९ डिसेंबरपर्यंत त्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले होते़ त्याचवेळी भोस्कर यांनी समस्या सुटल्या नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ मुख्याधिकाºयांच्या आश्वासनानंतरही समस्या सुटल्याच नाहीत़ त्यामुळे भोस्कर या विषाची बाटली घेवूनच नगरपालिकेच्या आवारात आल्या होत्या़ त्याचवेळी पोनि़ प्रदीप काकडे यांनी महिला पोलिसांच्या मदतीने भोस्कर यांची समजूत घातली़ तसेच प्रशासनाला हमीपत्र लिहून देण्याची विनंती केली़ त्यावरुन प्रशासनाने प्रभागातील समस्या १४ डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे हमीपत्र लिहून दिले़ त्यानंतर भोस्कर यांनी आंदोलन मागे घेतले़

Web Title: Tried two suicides in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.