जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:28+5:302021-06-02T04:15:28+5:30
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली. या आपत्तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने अधोरेखित ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्षलागवड
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली. या आपत्तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने अधोरेखित झाली. या बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वृक्षलागवडीची मोहीम पावसाळी हंगामात हाती घेण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक व्यक्तीने किमान ३ झाडे याप्रमाणे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागात सुमारे ७२ लाख ६६ हजार १२६ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन केले आहे. याशिवाय मियावाकी पद्धतीने गावातील मोकळ्या जागा, शासकीय कार्यालयांच्या परिसरात एक हजार प्लॉटमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. ५ जून रोजी वृक्षलागवडीचा प्रारंभ शासनाच्या कोविड-१९ सूचनांचे पालन करून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन वृक्षलागवडीची मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.