नांदेडात वृक्ष दत्तक योजना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:58+5:302021-06-05T04:13:58+5:30
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या दहशतीमुळे मानवाची श्वसन संस्था बाधित होत आहे. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन अनेक गंभीर ...

नांदेडात वृक्ष दत्तक योजना राबविणार
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या दहशतीमुळे मानवाची श्वसन संस्था बाधित होत आहे. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. या सर्व आपत्तीमध्ये प्राणवायूची मानवाला असलेली गरज प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. आजपर्यंत वृक्षांमार्फत मोफत होणारा प्राणवायूचा पुरवठा आपण दुर्लक्षित ठेवला याचे भान आज प्रकर्षाने जाणवत आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल कोरोनाच्या वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेणे काळाची गरज आहे आहे.
नांदेड शहरातील विविध भागात वृक्षमित्र परिवाराच्या वतीने वृक्षप्रेमींना रोप मोफत भेट देण्यात येणार आहे. या रोपाचे पालकत्व स्वीकारून संवर्धनाची जबाबदारी वृक्षप्रेमींनी पार पाडावी अशी अपेक्षा आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म त्वरित भरून पाठवावा. या अर्जामधून निवडलेल्या वृक्षप्रेमींना ५ जून ते २० जून या कालावधीत रोपाचे वाटप करण्यात येईल. कोरोनाच्या सुरक्षा नियमावलीचे बंधन पाळून हे वाटप करण्यात येईल.