२६ अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:12+5:302021-07-28T04:19:12+5:30
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होत असलेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ...

२६ अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या बदल्या
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होत असलेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद वाघमारे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, आरोग्य सहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गच्या बदली प्रक्रिया सुरु आहेत. या विभागाची आस्थापना मोठी असल्याने बदली प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
जिल्हयातील सर्व तालुक्यात असणाऱ्या जागांच्या समानिकरणानुसार बदल्या करण्यात येत आहेत. आज बुधवार २८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभाग तर ३० जुलै रोजी शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.