पॅसेंजर रेल्वेमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ
By Admin | Updated: May 14, 2014 01:13 IST2014-05-14T00:15:18+5:302014-05-14T01:13:56+5:30
नांदेडहून आदिलाबादकडे जाणार्या (क्रमांक ५७५५२) मध्ये समाजकंटाकांनी धुमाकूळ घातला आहे.
पॅसेंजर रेल्वेमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ
नांदेड: नांदेडहून आदिलाबादकडे जाणार्या (क्रमांक ५७५५२) मध्ये समाजकंटाकांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. यासंदर्भात प्रवाशांनी उपमहाप्रबंधक, यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. १२ मे रोजी समाजकंटाकांनी रेल्वेत धुमाकूळ घातला. रेल्वे आदिलाबादकडे जात असताना हिमायतनगर येथून काही समाजकंटक चढले, त्यांनी गाडीतील प्रवाशांना शिवीगाळ करणे, धमकावणे, मारहाण करणे आदी प्रकार सुरु केले. पुढे स्टेशन नसताना मध्येच गाडी थांबवून इतर ५ ते ७ साथीदारांना रेल्वेत बोलाविले आणि प्रवाशांना पुन्हा मारहाण केली. ही बाब दररोजचीच झाली आहे. आदिलाबादहून नांदेडकडे येणार्या रेल्वेला थेरबन व भोकरमध्ये गाडी थांबवून प्रवाशांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात प्रवाशांनी गार्डला विचारणा केली असता, गाडीत सुरक्षा गार्ड नाहीत, ते मुदखेडला मिळतील. तेव्हा तुम्ही मुदखेडला तक्रार करा. दरम्यान, गार्डच्या उत्तराने प्रवाशांची निराशा झाली. प्रवाशांची सुरक्षा करावी कोणी? असा सवाल निर्माण झाला आहे. निवेदनावर एस.जी. लोखंडे (रा. नांदेड), डी.एन. जाधव, (रा. पूर्णा), सी.व्ही. पारखे (मुदखेड) यांच्या स्वाक्षर्या आहेत.(प्रतिनिधी) रेल्वेच्या गार्डने प्रवाशांच्या तक्रारीवर केले हात वर रेल्वेतील प्रवाशांना धमकावणे, मारहाण करणे, अर्वोच्च बोलणे आदी प्रकार सुरु आहेत नांदेड- आदिलाबाद पॅसेंजर रेल्वेत प्रवाशांनी तक्रार केली असता, रेल्वेच्या गार्डने दाखविले मुदखेडकडे बोट सुरक्षा करावी कोणी? प्रवाशांचा सवाल